शौर्य पुरस्कार जाहीर… जम्मू-काश्मीर पोलीस पहिल्या तीन मध्ये

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२०: यावर्षीचे शौर्य व सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिस शौर्य पुरस्कारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या खात्यामध्ये ८१ मेडल गेले आहेत. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर सीआरपीएफ (५५ पदके) आणि तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेश पोलिस (२३ पदके) आहेत. गृह मंत्रालयाने शौर्य व सेवा पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, आंध्र प्रदेश पोलिस १६, अरुणाचल प्रदेश पोलिस ४, आसाम पोलिस २१, छत्तीसगड पोलिस १४, गोवा पोलिस एक, गुजरात पोलिस १९, हरियाणा पोलिस १२, हिमाचल प्रदेश पोलिस ४, झारखंड पोलिसांना २४, कर्नाटक पोलिसांना १८ शौर्य व सेवा पुरस्कार प्राप्त झाले.

याशिवाय केरळ पोलिसांकडे ६, मध्य प्रदेश पोलिस २०, महाराष्ट्र पोलिस ५८, मणिपूर पोलिस ७, मिझोरम पोलिस ३, नागालँड एक, ओडिशा १४, पंजाब १५, राजस्थान १८, सिक्कीम २, तामिळनाडू २३, तेलंगणा १४, त्रिपुरा ६, उत्तर प्रदेश पोलिस १०२, उत्तराखंड ४ आणि पश्चिम बंगाल यांना २१ शौर्य व सेवा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अंदमान निकोबार पोलिसांना २, चंडीगड पोलिसांना एक, जम्मू-काश्मीर पोलिसांना ९६, दिल्ली पोलिसांना ३५ लक्षद्वीप पोलिसांना २, पुदुचेरी पोलिसांना १ शौर्य व सेवा पदक मिळाले आहे.

त्याचबरोबर आसाम रायफल्सला १०, बीएसएफ ५२, सीआयएसएफ २५, सीआरपीएफ ११८, आयटीबीपी १४, एनएसजी ४, एसएसबी १२, आयबी ३६, सीबीआय ३२ आणि एसपीजी ५ शौर्य व सेवा पदके मिळाली आहेत. यावर्षी २१५ शौर्य पुरस्कार व ७११ सर्व्हिस मेडल्सचे वितरण करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा