ब्रेकअपनंतर मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास अटक

नोएडा, दि. ८ जून २०२०: नोएडा पोलिसांनी अश्लील व्हिडीओ गुन्हे प्रकारात एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली आहे. तो मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सध्या आरोपी युवकावर कारवाई केली जात आहे.

खरं तर, ३ मार्च रोजी एका मुलीने नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती की तिचा अश्लील व्हिडिओ फोटो सोशल मीडिया साइट्स फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि बर्‍याच पॉर्न साइट्सवर सतत अपलोड केला जात आहे आणि व्हायरल होतो आहे. इतकेच नाही तर अनेक वेबसाइट्सवर पेटीएमच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ विकले जात आहेत.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नोएडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी पीडितेचा पहिला प्रियकर होता आणि ४-५ वर्षांपासून या दोघांमध्ये संबंध होता. ब्रेक अपनंतर बदला घेण्यासाठी या तरूणाने मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल साइटवर टाकला. सध्या आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा