गोल पोस्ट गुन्हा लॉकडाऊन काळातही लाचखोरी.

लॉकडाऊन काळातही लाचखोरी.

उस्मानाबाद, दि. १८ मे २०२०: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या लॉकडाउन च्या काळात तंतोतंत नियमांचे पालन करणे चालू आहे. शासन आणि जनता कोरोना विरुद्ध एक होऊन लढा देत आहेत तर अशा गंभीर परिस्थितीमध्ये देखील पोलीसांची लाचखोरी चालूच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात मुरुमने भरलेला एक ट्रॅक्टर सोडण्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलने मिळून ५० हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना ट्रॅक्टरमधे मुरुमची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले. तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रूपयाची मागणी केली होती. तडजोड करून शेवटी ४५ हजार रूपये मागणी ठरवून पहिला हफ्ता ३० हजार रुपये घेऊन पीएसआयसह पोलिस कर्मचारी अन शासकीय वाहनचालक हे तिघेही पसार झाले.

दरम्यान सापळा अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तपास अधिकाऱ्यांना दुखापत झाली. लाच स्विकारणारे पीएसआय, दोन पोलिस कर्मचारी आणि शासकीय वाहन चालक हे शासकीय वाहनासह पसार झाल्याचे शेवटी समोर आले. अशी माहिती सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक जी. एस. पाबळे यांनी दिली आहे.

एसीबीच्या . उस्मानाबाद पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाशी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खटाने, पोलिस नाईक सम्राट माने, बाळासाहेब बिभीषण हाके व अनोळखी वाहन चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version