गोल पोस्ट गुन्हा शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच; तलाठ्यासह कोतवाल अडकला जाळण्यात

शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच; तलाठ्यासह कोतवाल अडकला जाळण्यात

जळगाव, २३ मार्च २०२३: शेतजमीन नावावर करून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु. ग्रामपंचायतीचे तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (वय ५०, शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय ३७. श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने आज दुपारी १ वाजता बोरखेडा बु. ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहाथ अटक केली आहे.

बोरखेडा गावातील ४२ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी मृत्यूपत्र केले असून त्यानुसार तक्रारदाराच्या नावे बोरखेडा बु. येथील शेतजमीन करण्यात आली असून त्यांच्या हिश्यावर एकूण तीन गट वाटणीस आलेले आहेत. तीन गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावावर करायची होती. या प्रकरण तलाठी काळे यांच्याकडे सादर केले होते. त्यावेळी काळे यांनी ७ हजार रुपये लाच स्वीकारली होती.

परंतु लाच स्वीकारली तरीही काम पूर्ण न केल्याने विचारणा केली असता अजून ५ हजार रुपये मागितले. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आज दुपारी १ वाजता तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच तलाठी व कोतवाल यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version