पुणे, १३ सप्टेंबर २०२२: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी चांदणी चौकातील जुना पूल पाडून वाहतूक वळवण्याच्या कामाला गती दिली आहे. सोमवारी जुन्या पुलाच्या खांबांमध्ये ब्लास्टिंगसाठी ‘जिलेटिन स्टिक्स’ लावण्यात आल्या होत्या. सध्याच्या ओव्हरब्रिजवरील सेवा आणि इतर पाइपलाइनचे स्थलांतर जवळपास पूर्ण झाले असून, सर्व्हिस रस्ते खुले करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारा हा पुल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर इथल्या वाहतूकीत बदल करण्यात आलेत. आजपासून या पुलावरची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
त्यामुळे कोथरूड किंवा सातारा रस्त्यावरून बावधन, पाषाणकडे जाण्यासाठी किमान दिड किलोमीटरचा वळसा घेऊन मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे. तेथून डावीकडे वळून नागरिकांना बावधन, पाषाणकडे जाता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप