ब्रिटनचा युक्रेनला पाठिंबा

रशिया, ४ ऑक्टोबर, २०२२ : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज २२३ वा दिवस. पण हे युद्ध आता संपण्याचे नाव घेत नाही. उलट हे युद्ध वाढण्याचे चित्र दिसू लागले आहे. खास करुन आता नाटोमार्फत अनेक देशांनी यात सहभाग घेतला आहे. यात आता ब्रिटनने भाग घेतला आहे. ब्रिटनने आता रचनात्मक प्रगल्भतेद्वारे युक्रेनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत युद्ध संपत नाही, तोपर्यंत ब्रिटन युक्रेनला पाठिंबा देणार असल्याचं ब्रिटनचे परदेश मंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी मंगळवारी सांगितले.

यावेळी बोलताना झेलेस्की यांनी सांगितले की, ठिकाणाबाबत आम्ही तह करण्यास तयार असून काही ठिकाणाबाबत आम्ही आग्रही आहोत. त्यासाठी आम्ही युद्धास तयार आहोत. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. ज्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा नक्कीच परिणाम होत आहे.

आता ब्रिटननेही अनपेक्षितपणे या युद्धात भाग घेतला आहे. रशियाने युक्रेनच्या लुहानत्सक आणि डोनात्सक या दोन भागांवर कब्जा केला असून, क्रेमलिनसुदधा आता रशियाच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे.

रशियाची ही आक्रमक भूमिका नक्कीच घृणास्पद असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय रित्या अनेक देशांना यामुळे धोका दिसू लागला आहे. युक्रेन हा स्वतंत्र आणि शांत देश असून रशियाच्या आक्रमणामुळे या देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे युक्रेनला आता पाठिंब्याची गरज असून ब्रिटनच्या पाठिंब्यामुळे युक्रेनला सक्षम होण्यास नक्कीच मदत मिळेल, असे मत नाटो या आंतरराष्ट्रीय संस्थेने व्यक्त केले आहे.

आता रशिया आणि युक्रेन युद्धाचा नक्की काय निर्णय लागणार आणि कोण कोणाच्या ताब्यात जाणार हे काळच ठरवेल. पण तोपर्यंत युक्रेनची शांती भंग झाली आहे, हे मात्र खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा