ब्रिटिश कालीन नियम स्थगित! आता 24 सुरू राहणार Post-mortem प्रक्रिया, पण असा मृत्यू नसावा

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021: आरोग्य मंत्रालयाने पोस्टमार्टम संदर्भात नवीन प्रोटोकॉल अधिसूचित केला आहे.  खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणे वगळता, योग्य पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन केले जाऊ शकते.  यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वतीने ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, ब्रिटिशकालीन व्यवस्था संपली!  24 तासांत शवविच्छेदन केले जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ ची कल्पना पुढे नेत आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की, ज्या रुग्णालयांमध्ये रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे ती आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करू शकतील.
 नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टम प्राधान्याने केले जावे.  तसेच, कोणत्याही शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळी सर्व पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.
 नवीन नियमानुसार खून, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह यासारख्या प्रकरणांमध्ये रात्री पोस्टमॉर्टम केले जाणार नाही.  त्याची माहिती संबंधित मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना कळवण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा