गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नवरा-बायकोच्या वादात मेव्हण्यावर वार; परिसरात गोळीबार

नवरा-बायकोच्या वादात मेव्हण्यावर वार; परिसरात गोळीबार

नाशिक, २८ सप्टेंबर २०२२: नाशिक शहरातील मालेगाव येथे कौटुंबिक वादातून मारामारी झाली. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी आहे. मालेगाव मधील सर्वे नंबर ५५ च्या निहाल नगर परिसरात पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून मेव्हण्यावर कटरने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

एवढेच नाही तर जमाव पांगवण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. ही घटना समजताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि हल्लेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

तसेच गोळीबार झाला की नाही याचा देखील पोलीस कसून तपास करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चौकशी करुन तो गुन्हा दाखल करण्यात येइल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सागिंतले आहे. तसेच जखमी सरताज याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जखमी सरताजची तब्येत गंभीर असल्याचे समजते आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version