बीएसएफने ५ पाकिस्तानी घुसखोरांना केले ठार

तरनतार, २२ ऑगस्ट २०२०: सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-पाकिस्तान सीमेवर पाच घुसखोरांना ठार केले आहे. पंजाबमधील तरनतार येथे पाच पाकिस्तानी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतरच बीएसएफच्या ४७ बटालियनने पाच जणांना ठार केले आहे. हे घुसखोर पाकिस्तानी दहशतवादी आहेत की तस्कर याबाबत सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाच घुसखोरांचे मृतदेह सापडले ताब्यात घेण्यात आले आहेत.घटनास्थळावरून एक रायफल आणि बॅगही सापडली आहे. ही चकमक तारण जिल्ह्यातील ढल पोस्टजवळ घडली. गुप्तचरांच्या आधारे शुक्रवारी बीएसएफच्या १०३ बटालियनने शोधमोहीम सुरू केली. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी, त्यांना ढालच्या सरहडी गावाजवळ पाकिस्तानच्या बाजूने काही संशयास्पद व्यक्ती भारतीय सीमेच्या दिशेने येताना दिसले. त्यानंतर सैनिकांना त्यांना सतर्क केले गेले.

पाकिस्तानची संबंधित देशातील आज ही दुसरी घटना आहे. दिल्लीमध्ये देखील एन्काऊंटर मध्ये एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आला आहे. त्याकडेच आय ई डी देखील सापडले आहेत. तर एक दहशतवादी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा