मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५ : देशातील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदा नफ्यात आलीय. डिसेंबर तिमाहीत बीएसएनएलने २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
बीएसएनएलने शेवटचा तिमाही नफा २००७ मध्ये नोंदवला होता. दुसरीकडे नफ्याबरोबरच बीएसएनएलचे ग्राहकही वाढले असून, डिसेंबरमध्ये ग्राहकांची संख्याही ९ कोटींवर पोहोचली आहे, जी जूनमध्ये ८.४ कोटी होती.
पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल. हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने, बीएसएनएलने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १७ वर्षांत प्रथमच तिमाही नफा नोंदवलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : पूनम सुपेकर – जठार