बुद्धिबळातील ‘कोहीनूर’ विश्वनाथन आनंद

41

बुद्धिबळातील जगज्जेतेपद निर्विवाद गाजवणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणजे विश्वनाथन आनंद. त्यांचा आज वाढदिवस. यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्याविषयी खास काही…
आनंद यांना बुद्धिबळाची प्रेरणा आई व मामांकडून मिळाली. ते बुद्धिबळ खेळत असल्याने आनंद त्याकडे आकर्षित होत गेले. मात्र बुद्धिबळात यश मिळवायला सुरु केल्यावर त्यांनी परत मागे पाहिलेच नाही.
वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेचे निवृत्त महाव्यवस्थापक आहेत. त्यांची आई सुशीला ही गृहिणी व त्यांच्या गुरु आहेत. त्यांना एक बहीण व एक भाऊ आहे.
वयाच्या ६ व्या वर्षापासूनच त्यांनी बुद्धिबळाच्या पटाशी गट्टी जमविली. पाहता-पाहता त्यांनी या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त केले.
१९९३ मध्ये ९ पैकी ९ गुण घेत ते कनिष्ठ गटाचे राष्ट्रीय विजेते बनले. वयाच्या १५ व्या वर्षी ते ‘इंटरनॅशनल मास्टर’ बनले. हे विक्रम करणारे आशियातील ते एकमेव खेळाडू आहेत.

१९८६ मध्ये १६ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. १९८६ मध्ये फिलिपाईन्समध्ये जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारे ते पहिले आशियाई ठरले. १९८७ मध्ये ते ग्रॅण्डमास्टर बनणारे ते एकमेव भारतीय आहेत.

१९९१ मध्ये गॅरी कॅस्पारॉव्ह व अनातोली कारपोव मागे टाकून ‘रेगिया इमीलिया’ स्पर्धा त्यांनी जिंकली. १९९८ मध्ये लिनारेस विजेतेपद त्यांनी मिळविले. पाच वेळा कोरस बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

दरम्यानच्या काळात गॅरी कॅस्पारॉव्ह, मिखेल बोत्वीनिक, बोरिस स्पॅस्की, अ‍ॅलेक्झांडर अलीखाईन व व्लादिमीर क्रॅमनिक या रशियातील खेळाडूंचे वर्चस्व विश्वनाथन आनंद यांनी मोडून काढले.

बुद्धिबळातील सर्व प्रकारामध्ये जिंकलेले आनंद हे एकमेव खेळाडू आहेत. ४ वेळा जगज्जेता, ५ वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारे आनंद गत 3 दशकांपासून बुद्धिबळाचे राजा आहेत.

आनंद यांचे यश

▪ ४ वेळा जगज्जेतेपद २०००, २००७, २००८ आणि २०१०
▪ ५ वेळा बुद्धिबळातील ऑस्कर (खेळातील सर्वोत्तम पुरस्कार)
▪ बुद्धिबळातील सर्व प्रकाराचे जगज्जेतेपद जिंकलेले एकमेव.
▪ सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम.
▪ राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी (१९९१)

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा