बुलेट ट्रेनला लागणार ठाकरे सरकारचा ब्रेक?

मुंबई: राज्यात स्थापन झालेल्या नव्या ‘ठाकरे सरकार’ ने भाजपाला एक धक्का दिला आहे.
आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला मोर्चा पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे वळवला आहे.
११ लाख कोटी रुपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.
या प्रकल्पांचा अंदाजे खर्च, त्यातील अडथळे आणि त्या प्रकल्पांची मुदत अशा सर्व बाजूंनी या प्रकल्पांचा आम्ही पुन्हा एकवार आढावा घेऊ. त्यानंतर त्यापैकी कोणता प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावायचा ते ठरवू.
आमचे सरकार सूडबुद्धीने कुठलेही निर्णय घेणार नाही. ‘इतर सर्व प्रकल्पांचा जसा फेरआढावा घेण्यात येणार आहे, तसाच तो बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा