बुलेट ट्रेनची योजना बंद करणार : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: बुलेट ट्रेनची योजना राज्याला परवडणारी नाही. हा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही बंद करणार आहोत, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
यावेळी चव्हाण म्हणाले की, बुलेट ट्रेनचा प्रकल्प आजच्या काळात सुरू ठेवणं योग्य नाही. त्याची आज गरजही नाही. हा खर्चिक प्रकल्प राज्याच्या माथी मारणं योग्य होणार नसल्याने आम्ही हा प्रकल्प बंद करणार आहोत. भाजपने साम, दाम, दंड वापरून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच भाजपला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.
जलसंधारणाची योजना आमचीच होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्या योजनेचं केवळ ब्रँडिंग केलं. त्या योजनेचं ठेकेदारीकरण केलं अशी जाहीर टीका चव्हाण यांनी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा