रावेर तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी, तहसीलदारांना जेसीबीद्वारे चिरडण्याचा प्रयत्न

जळगाव १३ जून २०२३: जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी वाढत चालली आहे. अवैध वाळू वाहतूकीविरोधात कारवाई केल्याने प्रोबेशनवर असलेल्या तहसीलदारांवर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला तर मंडळ अधिकाऱ्याला चालत्या ट्रॅक्टरवरुन ढकलून दिल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तहसीलदार मयूर कळसे यांनी रावेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील पार्तोडा शिवारातील भोकर नदीपात्रातून, अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकास मिळाली होती. यानंतर प्रोबेशनवर असलेले तहसीलदार मयूर कळसे, मंडळधिकारी जनार्दन भंगाळे, यासीन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर, कोतवाल प्रवीण धनके आदींच्या पथकासह पार्तोडी शिवारात भोकर नदीपात्रात छापा टाकला.

या ठिकाणी कारवाईसाठी पथक गेल्यानंतर मोहन बोरसे या व्यक्तीने जेसीबी चालू करून अंगावर आणला. मात्र तहसीलदार मयूर कळसे हे बाजूला झाल्याने ते बचावले तर जेसीबी चालक पसार झाला. या प्रकरणी मोहन बोरसे, मनोज बोरसे व त्याच्यासोबतचे ८ ते ९ इतर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कैलास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विशाल सोनावणे पुढील तपास करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा