गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट बुमरा जेव्हा स्टम्प तोडतो…

बुमरा जेव्हा स्टम्प तोडतो…

नवी दिल्ली: भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्या संघात नाही. त्यामुळे तो स्टम्प तोडेल, असे वाटत नाही. पण बुमराने अर्धा स्टम्प तोडल्याची चर्चा सुरु आहे.
आगामी टी-२० विश्वचषक खेळण्याचे ध्येय बुमराने ठेवले आहे. त्यामुळे बुमरा सध्या सराव करत आहे.
या सरावादरम्यान गोलंदाजी करत असताना बुमराने एक स्टम्प तोडला आहे. या तुटलेल्या स्टम्पचा फोटो बुमराने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तेथे दोन कसोटी, पाच टी-२० आणि तीन वन-डे सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये बुमराह कमबॅक करेल अशी चर्चा आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version