गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट ‘पृथ्वी’च्या बॅटवर विराटचा संदेश

‘पृथ्वी’च्या बॅटवर विराटचा संदेश

मुंबई : आठ महिन्यांच्या डोपिंग बंदीवरुन परत आलेल्या पृथ्वी शॉने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत पुनरागमन केले आहे.
पृथ्वीच्या याच कामगिरीमुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पृथ्वीच्या बॅटवर खास संदेश लिहून देत ऑटोग्राफही दिला आहे. ‘डियर पृथ्वी, गेमचा आनंद घ्या, शुभेच्छा.’ असा संदेश विराटने पृथ्वीच्या बॅटवर लिहिला असून त्याखाली स्वाक्षरीही केली आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळत पृथ्वीने ३९चेंडूत ६३ धावा केल्या. यानंतर पृथ्वीने १७चेंडूत ३० धावा, ३९ चेंडूत ६४ धावा, १९ चेंडूत ३० धावा आणि शेवटच्या सामन्यात २७ चेंडूत ५३ धावा केल्या.
दरम्यान, मुंबई संघ सेमीफायनलमध्ये स्थान मिळवू शकला नसला तरीही पृथ्वीच्या या कामगिरीमुळे संघाला बळकटी मिळाली.

error: Content is protected !!
Exit mobile version