गोल पोस्ट क्रीडा ऑलिम्पिक दीपिका कुमारीचा सुवर्णवेध

दीपिका कुमारीचा सुवर्णवेध

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकसाठी एशियन कॉन्टिनेंटल आर्चरी पात्रता स्पर्धेच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिका कुमारीने गोल्ड मेडल जिंकले आहे.
एकतर्फी फायनलमध्ये दीपिकाने अंकिता भकत हिला ६-० ने पराभूत केले आणि सुवर्ण पदक जिंकले.
यापूर्वी या जोडीने सेमीफायनल फेरीत धडक मारून देशासाठी आणखी एक ऑलिम्पिक कोटा मिळविला होता.
या महाद्वीपीय पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजांनी उत्कृष्ट मानांकित दीपिका आणि सहाव्या मानांकित अंकिताने अंतिम चारमध्ये पोहचून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्थान पक्क केले.
आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियावरील बंदीमुळे दीपिका, अंकिता आणि बॉम्बेला देवी लैश्राम हे भारतीय त्रिकुट तटस्थ ध्वजाखालील स्पर्धेत भाग घेत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version