गोल पोस्ट गुन्हा बारामतीत घरफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास

बारामतीत घरफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास

बारामती, ७ ऑक्टोबर २०२० : बारामती शहरातील जुन्या मोरगाव रस्त्यावरील जगताप मळा येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने यांच्यासह ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात वर्षा जितेंद्र महाडीक यांनी तक्रार दाखल केली आहे. दि.३ शनिवार रोजी सर्व महाडीक कुटुंब नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. त्यानंतर दि. सोमवार ५ रोजी महाडिक यांच्या समोर राहणाऱ्या संजय बनकर यांना महाडीक यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे लक्षात आल्यावर याबाबत बनकर यांनी महाडीक यांना माहिती दिली.

तक्रारदार यांचे दीर अविनाश महाडीक यांनी घरी जाऊन पाहणी केली असता घरातली कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तर बंगल्याची पाहणी केली असता कपाटातील २१ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, १६०० रुपयांचा चांदीचा नेकलेस, ५५०० रुपयांचे बिछवे व १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या समोरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडत घरात प्रवेश करून ही चोरी केल्याचे महाडिक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version