काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पोस्टरवर जळती खाकी चड्डी

तिरुवनंतपुरम, १२ सप्टेंबर २०२२: भारत जोडो यात्रे वरून भाजप आणि काँग्रेस मध्ये सातत्याने वाद सुरू आहे. सोमवारी केरळमधील यात्रेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गणवेश असणाऱ्या खाकी चड्डीचे जळते छायाचित्र शेअर केले.

काँग्रेसने शेअर केलेल्या फोटोत खाकी चड्डीचा एक कोपरा जळताना दिसून येत आहे. काँग्रेसने या फोटोच्या कॅप्शनखाली लिहिले आहे – देशाला द्वेषाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी व भाजप-संघाने केलेले नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही हळू-हळू आमच्या उद्दीष्टाकडे पोहोचत आहोत आणि आता १४५ दिवस शिल्लक आहेत.

या ट्विटनंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. दक्षिण बंगळुरुचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस देश पेटवते हे मान्य केल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा