बस आणि टेम्पो अपघातात चार ठार

बीड: केज तालुक्यातील चंदन सावरगाव जवळ बस आणि टेम्पोच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस मधील ४प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर १५ जण गंभीर झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगरकडून अंबाजोगाईकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल. ३७२१) आणइ कोंबड्या घेऊन केजकडे येणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की बसची उजवी बाजू पूर्णपणे फाडली गेली. या अपघातामध्ये बसमधील ४ प्रवासी जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमीना अंबाजोगाई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा