पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थ्यांसह चालक जखमी

जळगाव, १८ जुलै २०२३: भरधाव बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पाचोरा तालुक्यात घडली आहे. बसचालकासह २० प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये १३ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोसला ते पाचोरा ही बस पाचोऱ्याकडे येत होती. सकाळी सव्वासहाच्या सुमारास पाचोरा शहराजवळ समोरून येणाऱ्या ट्रकवर बस समोरासमोर धडकली. या बसमध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे या अपघातात १३ विधार्थी जखमी झाले आहेत. एकूण २० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पुजा मनगटे, प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड, हे विदयार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा