पालघर, २२ जुलै २०२०: राज्य परिवाहनची बस वेळेवर न आल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी बुधवारी नालासोपारा रेल्वे स्थानकावर निदर्शने केली.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, राज्य परिवहनची सकाळी ८.२५ वाजताची बस सेवा खंडित झाल्यामुळे नालासोपारा स्थानकावर सुमारे २०० लोक आले. त्यांनी नालासोपारा प्लैटफार्म नं-१ येथे लोकल व्हीआर -३७ ला ८.२७ वाजल्या पासून ते ८.३१ वाजे पर्यंत रोखून धरले.
आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिका-यांनी प्रवाशांना सांगितले की, केवळ अधिसूचित केल्याप्रमाणे खास उपनगरी रेल्वे सेवा चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, बहुतेक निषेध करणारे हे खासगी कंपन्यांचे कर्मचारी होते जे त्यांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची वाट पहात होते, परंतू बस न मिळाल्यामुळे ते पालघर जिल्ह्यातील नालासोपारा रेल्वे स्थानकात आले आणि ते रेल्वे ट्रॅक अडवून बसले. एसआरटीसी बसेसची अनुपस्थिती ही नियमित घटना असल्याने त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांची होती.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागातील लोकल रेल्वे नेटवर्क १५ जूनपासून पुन्हा सुरू केले गेले असले तरी रेल्वेने महाराष्ट्र सरकारने मान्यताप्राप्त आवश्यक सेवा कर्मचार्यांनाच रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी