पुणे ५ मार्च २०२६ : इ-चलन प्रणालीच्या विरोधात बस मालक आणि चालक आक्रमक झाल्याचे चित्र आज पुण्यात पाहायला मिळाले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधून 40 हून अधिक बसेस मोठ्या ताफ्यासह पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्या.
इ-चलनमधील त्रुटी आणि जाचक नियमांविरोधात बस चालक व मालक मोठ्या प्रमाणात संघटित झालेले दिसून आले. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.दरम्यान, या मोर्चामुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
इ-चलन प्रणालीविरोधात बस चालक व मालकांचा हा आक्रोश प्रशासनाकडून कसा हाताळला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : दिनेश वढणे














































