बारामतीतून मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या मजुरांना सोडण्यासाठी बस रवाना

बारामती,दि.१२ मे २०२०: कोरोना संसर्गाच्या धर्तीवर परप्रांतीय कामगारांना हाताला काम नसल्याने आपल्या गावी जाण्यासाठी तहसीलदार कार्यालय व एसटी महामंडळाने बारामती येथून जाण्याची मोफत व्यवस्था केली आहे. सोमवारी ( दि.११) रोजी प्रशासन भवन येथून पाच एस टी बस या कामगारांना घेऊन मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूरकडे रवाना झाल्या. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन परिस्थिती मध्ये परराज्यातून आपल्याकडे कामाला आलेल्या लोकांना सध्या त्यांच्या गावाकडे सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानंतर बारामती तहसीलदार कार्यालयात या कामगारांची नोंदणी करून घेतल्यावर व त्यांच्या राज्यातून परवानगी आल्यावर त्यांना एसटी महामंडळाने आपल्या गावी मोफत सोडण्याची सोय केली आहे. सोमवारी बारामती प्रशासन भवन येथून व तांदुळवाडी गावातून पाच एसटी बस रवाना झाल्या यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले या बस मध्यप्रदेशच्या सीमा रेषेवर बुऱ्हाणपूर येथे या कामगारांना सोडणार आहेत.

प्रत्येक सीटवर एक असे फक्त २२ लोक यावेळी प्रवास करतील कालपर्यंत १३० प्रवासी आज ११० मध्यप्रदेश तर तेलंगणा राज्यातील ३० लोकांना रवाना करण्यात आले. तसेच आज देखील एमआयडीसी येथील रुई पाटी व वंजारवाडी येथून ७ बस मध्यप्रदेशकडे रवाना होतील सध्या छत्तीसगड व मध्यप्रदेश सरकारने परवानगी दिल्याने या राज्यातील लोकांना आम्ही पाठवत आहोत असे उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी सांगितले.

यावेळी या प्रवास करणाऱ्या लोकांनी जेवण व पाणी स्वतः बरोबर घ्यायचे आहे.असे निर्देश दिले आहेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे ,तहसीलदार विजय पाटील ,आगर प्रमुख अमोल गोंजारी ,निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव , तसेच प्रशासन भवन येथील व एसटीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा