उद्योजक रविराज सपकाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

फलटण,सातारा ११ ऑगस्ट २०२३ : इंदापूर तालुक्यातील सपकाळवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज नारायण सपकाळ वय ३६ वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. रविराज सपकाळ यांच्या अचानक जाण्याने परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

इंदापूर तालुक्यातील सपकाळवाडी गावचे रविराज नारायण सपकाळ हे उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते .त्यांनी अश्विनी मसाले या नावाची कंपनी स्थापन केली होती. अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता. ते सपकळवाडी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सपकाळ यांचे ते पती होत. त्यांच्या मागे एक मुलगा व आई असा परिवार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा