नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२०: आजकल वाहन खरेदी करणं खूप सोपे झाले आहे. बँक आणि इन्शुरन्स कंपनीस ग्राहकांना वाहन खरेदी करण्यासाठी सहज लोन उपलब्ध करून देत असतात. अशातच तुम्ही जर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल तर घाबरून जाऊ नका. आपल्या देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँक आपल्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. ऑफर चा लाभ घेण्यासाठी वेतन फक्त ८००० रुपये असायला हवे. ही स्कीम फक्त महिलांकरिताच आहे. या स्कीम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता आपण बँकेच्या संकेतस्थळा वरून माहिती करून घेऊ शकता.
ही स्कीम पंजाब नॅशनल बँक च्या महिला ग्राहकांकरिता आहे. या स्कीम ला ” पी. एन.बी. पावर राईड ” असे नाव देण्यात आले आहे. यात कमीत कमी वेतन असलेल्या महिलांना ही टू व्हीलर वाहन घेण्याची मुभा बँके तर्फे देण्यात आली आहे.
कोणत्याही महिलेचे वेतन ८००० असेल आणि त्यांना ६ महिन्यापेक्षा जास्त अनुभव असेल. त्या महिलांना या स्कीमचा लाभ उचलता येणार आहे. आणि जर कोणी सेल्फ एम्प्लॉइड महिला असेल त्यांना कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी असल्यास त्यांना आई – वडिलांना एप्लिकेंट लावून वाहन खरेदी करू शकतात. लोन साठी अप्लाय करण्यासाठी वयो मर्यादा १८ ते ६५ असणे गरजेचे आहे. यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स असनेही बंधनकारक असेल.
पंजाब नॅशनल बँक तर्फे जास्तीत जास्त ६०,००० लोन दिला जाणार आहे. तसेच उरलेली रक्कम ही डाऊन पेमेंट मधून घेतली जाणार आहे. ग्राहकांना १०% टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट स्वरूपात द्यावी लागणार आहे. या स्कीम मध्ये ग्राहकांना लोन परत फेड करण्याचा अवधी हा ३६ महिने असणार आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या पंजाब नॅशनल बँक च्या शाखेत जाऊन माहिती घेऊ शकता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे