वर्षाच्या अखेरपर्यंत ६७ कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होईल

नवी दिल्ली, दि.३१ मे ,२०२०: यंदाच्या वर्षा अखेरपर्यंत देशातील ६७ कोटी लोकांना कोरोनाची लागण होईल, असा अंदाज राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूशास्त्र संस्थेने (निमहंस / Nimhan) वर्तविला आहे.

याबाबत निमहंसमधील मधील डॉक्टरांच्या मतानुसार, लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. यानंतर भारतात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होईल, अशी भीती डॉक्टरांनी वर्तविली आहे.

मात्र, यापैकी ९० टक्के लोकांना आपल्याला  कोरोनाची लागण झाली आहे, हे समजणार देखील नाही. कारण या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येणार नाहीत. केवळ पाच टक्के रुग्णांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल.

मात्र, ६७ कोटींपैकी ५ टक्क्याचा हिशेब करायचा झाला तरी देशातील ३० लाख लोकांची प्रकृती गंभीर असेल. त्यामुळे आगामी काळात देशातील आरोग्य यंत्रणेला जय्यत तयारी करावी लागणार आहे. तरच कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल, अन्यथा भविष्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल.असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा