गोल पोस्ट महाराष्ट्र कै. कृष्णात बोबडे यांना श्री. माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

कै. कृष्णात बोबडे यांना श्री. माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

माढा, २३ डिसेंबर २०२०: श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी-आनंद विद्या मंदिर व जुनिअर कॉलेज, सनराईज इंग्लिश मिडीअम स्कूल ( गुरूकुल), सनराईज फ्युचर क्रिएशन, या शाखांच्या वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्थेच्या पायाभरणीपासून ते आजपर्यंत दादांनी केलेल्या कार्याचा आणि ध्येय व धोरणाचा आणि समाजाप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेचा आढावा संस्थेतील सहशिक्षक प्राध्यापक बनसोडे सिद्धू यांनी घेतला.

तसेच कुटुंब कर्ता कसा असतो आणि कुटुंबाला आदर्शत्वाकडे घेऊन कसे जायचे असते, कुटुंबातील आपल्या प्रत्येक पाखरांनी उडत असताना पंखांमध्ये बळ कसे आत्मसात करावयाचे असते आणि ही आत्मसात केलेली ताकत घेऊन आपल्या पंखांनी कसे जगायचे. याचा जणू सल्लाच त्यांनी आपल्या पाखरांना दिला होता. असे विचार संस्थेतील सह शिक्षक बापूराव हेंबाडे यांनी मांडले.

याप्रसंगी सनराईज गुरुकुलचे प्राचार्य सिद्धलिंगप्पा प्रभाकर, संस्थेचे कॉर्डिनेटर शंकर सोनटक्के सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version