जो बिडेन यांनी केली कॅबिनेटची घोषणा, अँटनी ब्लिंकन परराष्ट्रमंत्री

वॉशिंग्टन, २४ नोव्हेंबर २०२०: अमेरिकेचे भावी अध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे चेहरे जाहीर केले आहेत. बिडेन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी मुत्सद्दी एंटनी ब्लिंकेन यांना परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त केलं.

५८ वर्षीय ब्लिंकेन यांनी बराक ओबामा प्रशासनात उप परराष्ट्रमंत्री उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून काम पाहिलं. तसंच ते बीडेन यांच्या २०२० च्या राष्ट्रपती पदाच्या अभियानातील एक परराष्ट्र धोरण सल्लागार देखील आहे.

दुसर्‍या महत्त्वपूर्ण नियुक्तीमध्ये, बिडेन यांनी जेक सुलिवान यांना त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं. निवडणुकीनंतर बिडेन यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांचं कॅबिनेट अमेरिकेसारखं दिसंल आणि देशाच्या आधुनिक राजकीय इतिहासामध्ये सर्वात वैविध्यपूर्ण असंल.

बायडेन राष्ट्रपती झाल्यामुळं भारतीय वंशाच्या एक महिला प्रथमच उपाध्यक्षपदावर पोहोचल्या आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदी विराजमान होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा