10 मार्चला उघडू शकतो LIC IPO, 7 शेअर्सचे लॉट, गुंतवावे लागतील इतके पैसे

LIC IPO Details, 17 फेब्रुवारी 2022: तुम्ही LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला लवकरच ही संधी मिळणार आहे. 31 मार्चपूर्वी हा आयपीओ सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. पण दरम्यान, मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, IPO 10 मार्च 2022 ला लॉन्च केला जाऊ शकतो.

अहवालानुसार, हा IPO 10 मार्च रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला असेल आणि 14 मार्चपर्यंत खुला राहील. असं वृत्त आहे की एलआयसीच्या इश्यूचा आकार 65,000 कोटी रुपये असू शकतो. बहुतेक रिटेल गुंतवणूकदारांमध्ये LIC IPO बद्दल उत्साह दिसून येत आहे.

इश्यू प्राइस संबंधी बातम्या

लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की या मेगा IPO मध्ये अर्ज करण्यासाठी किमान किती पैसे लागतील. सध्या सुरू असलेल्या अनुमानांवर विश्वास ठेवला तर एलआयसीची इश्यू किंमत 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान असू शकते. अशा स्थितीत, अपर प्राइस बँडनुसार, रिटेल गुंतवणूकदाराला 14,700 रुपये एका लॉट साठी गुंतवावे लागतील. एक लॉट 7 शेअर्स चा असू शकतात.

तथापि, LIC IPO च्या प्राइस बँड आणि उघडण्याच्या तारखेबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत, प्राइस बँड आणि आयपीओ उघडण्याच्या तारखेबाबत सुरू असलेल्या बातम्या केवळ अनुमानांवर आधारित आहेत.

5 टक्के हिस्सा विकण्याची तयारी

वास्तविक, विमा कंपनी (LIC) ने 13 फेब्रुवारी रोजी सेबीकडं ड्राफ्ट कागदपत्रं सादर केली होती. हे दस्तऐवज सादर केल्यानंतर कंपनी मार्चपर्यंत 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. मसुद्यानुसार एकूण 31,62,49,885 शेअर्स जारी केले जातील.
LIC च्या मेगा IPO नंतर, ती रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ला मागे टाकून मार्केट कॅपमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सरकार 31 कोटी इक्विटी शेअर्सद्वारे 5 टक्के स्टेक विकणार आहे. सध्या सरकारची LIC मध्ये 100% हिस्सेदारी आहे.

LIC पॉलिसीधारकांमध्ये ‘डिस्काउंट’ बाबत उत्साह अपेक्षित

देशातील या सर्वात मोठ्या IPO साठी सरकारने पॉलिसीधारकांसाठी एक हिस्सा राखून ठेवला आहे. LIC च्या IPO मधील 10% हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. असं मानलं जातं की सामान्य गुंतवणूकदारांना देखील IPO मध्ये शेअरच्या किमतीत 5 टक्के सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत पॉलिसीधारकांना आयपीओचा उत्साह पाहायला मिळू शकतो.

शेअर बाजारात संभाव्य वाढ

LIC हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमा ब्रँड आहे. LIC च्या भारतात सुमारे 29 कोटी पॉलिसी आहेत, ज्यामध्ये काही लोकांकडं एकापेक्षा जास्त पॉलिसी आहेत. अशा परिस्थितीत एकूण पॉलिसीधारकांची संख्या 20 ते 25 कोटींच्या दरम्यान असू शकते असा अंदाज आहे. अशा स्थितीत या मोठ्या आयपीओमुळं बाजारात गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढेल, असं तज्ज्ञांचे मत आहे. तसेच त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येतो. रिटेल गुंतवणूकदारही बाजारात उतरतील.

निर्गुंतवणुकीचं लक्ष्य गाठलं जाईल

LIC ची निर्गुंतवणूक किंवा समभाग विक्री करून सरकारला आपल्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याच्या जवळ जायचं आहे. गेल्या वर्षी, सरकारने 2021-22 साठी 2 लाख कोटी रुपयांचं निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पात ते 78,000 कोटी रुपये करण्यात आलं आहे. मात्र, आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून सुमारे 12 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारला 31 मार्चपर्यंत निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 66 हजार कोटी रुपये उभे करावे लागतील. एलआयसीच्या यशस्वी आयपीओच्या मदतीनेच हे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा