गोल पोस्ट महाराष्ट्र रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे परवाने होणार रद्द

रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे परवाने होणार रद्द

मुंबई : रुग्णांना सेवा नाकारणारे खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांवर कारवाई करत संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे. एका वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोऱ्या जात असून खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत.
मात्र, काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत.
संपूर्ण देश या संकटाला सामोरे जात आहे. मात्र आरोग्य क्षेत्रातील काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असं आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version