अहमदनगर: कुटुंबाने दिलेल्या पाठबळातून आपण कॅन्सरकडे मृत्यू नव्हे तर जगायचे कसे या सकारात्मक दृष्टीने पाहिले, असे भावनिक उद्गार अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी काढले. कॅन्सरसारख्या आजाराने खचून न जाता आनंदी जीवनाची राहण्याची इच्छाशक्ती ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिलांमधे आढळणाऱ्या कॅन्सर विषयी जनजागृती होऊन, त्या महिलांना उपचाराची माहिती व त्यांचे सकारात्मक प्रबोधन व्हावे या उद्देशाने अहमदनगर कॅन्सर सोसायटी, आनंदीबाई फाऊंडेशन व मॅककेअर हॉस्पिटल यांच्या वतीने ‘आशेची पालवी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास स्वतः कॅन्सरला सकारात्मक वृत्तीने सामोरे गेलेल्या अभिनेत्री मनीषा कोईराला उपस्थिती होत्या. यावेळी त्यांनी त्यांचा कॅन्सरविषयीचा अनुभव सांगितला.
आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, धनश्री विखे, सुजाता लंके, निर्मला मालपाणी, सुजाता तनपुरे, प्रभावती ढाकणे, सविता बोठे, श्रीमरापूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक उपस्थित होत्या.