मनोज कुमार गायकवाड यांना संभाजी ब्रिगेडची उमेदवारी

माढा दि.७ नोव्हेंबर २०२० : पुणे पदवीधर मतदार संघातून उद्योजक व अभियंता मनोजकुमार गायकवाड यांना संभाजी ब्रिगेड तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड मनोज आखरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने मनोज कुमार गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर, सोलापूर या परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ही विचारधारा रूजवण्यासाठी संभाजी ब्रिगेडला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी आखरे यांनी केले आहे.

मनोज गायकवाड हे माढा तालुक्यातील वरवडे या गावचे सुपुत्र आहेत.मनोजकुमार गायकवाड यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी अनुदान मिळावे याकरिता लढा उभारला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा