गोल पोस्ट गुन्हा माढा तालुक्यातील बावी येथे तुरीच्या पिकात गांजाची लागवड; मुद्देमालासह आरोपीनां केली अटक

माढा तालुक्यातील बावी येथे तुरीच्या पिकात गांजाची लागवड; मुद्देमालासह आरोपीनां केली अटक

माढा, ३ नोव्हेंबर २०२०: माढा तालुक्यातील बावी या गावी दोन आरोपींनी चक्क शेतात मानवी मेंदू व मनावर विपरीत परिणाम करणारे पीक म्हणजेच गांजाची लागवड केली होती.

तुरीच्या पिकात हे गांजाचे आंतरपीक घेतल्याने हे कोणाच्याही निदर्शनास आले नाही. परंतु ही गांजाची झाडे जसजशी मोठी होत गेली. त्या झाडांचा वास आजूबाजूच्या परिसरात सुटल्याने चर्चा होऊन माहिती पोलिसांपर्यंत पोचली. या प्रकरणात बंडू औदुंबर मुळे वय 48 विश्वनाथ कुंभार वय 50 दोघेही बावी तालुका माढा येथील असून आरोपींना अटक केली आहे.

या गांजाच्या झाडांची उंची चार ते पाच फूट असून होती तर वजन 130 किलो 900 ग्रॅम वजन भरले याची किंमत 669500 किमतीच्या गांजासह आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version