मुंबई, १८ ऑगस्ट २०२० : घराच्या छतावरील खराब सामानापासून सहा आसनी प्रयोगशील विमानाची निर्मिती करणा-या कॅप्टन अमोल यादव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भेट घेतली. मुंबईतील रहिवासी असलेल्या अमोलने १८ वर्षांच्या मेहनतीनंतर हे विमान तयार केले आहे.
अमोलची कहाणी लाखो तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. ज्यांना देशाच्या बांधणीत काहीतरी करायचे आहे. स्वदेशी विमानांची निर्मिती ही त्यांच्या संयम आणि दृढनिश्चयाची गोष्ट असून मेक इन इंडियाचेही हे एक उत्तम उदाहरण आहे. कारण, त्यांनी ते बनवण्यासाठी त्यांच्या निवासी इमारतीच्या छतावर पडलेल्या वस्तू वापरल्या आहेत.
२०११ पासून अमोलला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (डीजीसीए) कडून विमानाची परवानगी घेताना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. याबाबतची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून दिले. तरुण पायलटला लवकरात लवकर परवानगी देण्याचे निर्देश त्यांनी डीजीसीएला दिले. तीन दिवसांपूर्वी कॅप्टन अमोल यांना हे विमान उड्डाण करण्यास मान्यता मिळाली. पंतप्रधानांना भेटल्यानंतर अमोल यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी