कॅप्टन कुल धोनीला संघात स्थान नाही

19

नवी दिल्ली(वृत्त संस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या मालिकांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. परंतु या संघात धोनीला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे धोनीला संधी मिळणार की थेट निवृत्ती घ्यावी लागणार, या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये धोनीला आता संधी देण्यात येणार, असे म्हटले जात होते. पण निवड समितीने मात्र धोनीला यावेळी संधी दिलेली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. या संघात भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कमबॅक झाले आहे. पण महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अगरवाल यांना या संघात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. पण ही चर्चा अखेर फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा