गोल पोस्ट महाराष्ट्र कर्नाटकातील शिवापूर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या वाहनाचा मोठा अपघात, दोघांचा मृत्यू तर...

कर्नाटकातील शिवापूर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या वाहनाचा मोठा अपघात, दोघांचा मृत्यू तर स्वामी गंभीर जखमी

बेळगाव १७ जून २०२३: धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याच्या विरोधात, बेळगावात विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या स्वामीजींच्या गाडीचा, पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव तालुक्यातील काकती येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा सेवकांचा जागीच मृत्यू झाला असून स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात झालेले स्वामीजी यांचे नाव काडासिद्धेश्वर असून ते कर्नाटकातील शिवापूर मठाचे स्वामी आहेत. त्यांच्या कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. गंभीर जखमी असणाऱ्या स्वामीजींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काकती पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन मृत पावलेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात पाठवले. काडसिद्धेश्वर स्वामीजींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version