कारमधून बाहेर पडल्यानंतर पोलिसांना सावरताच आले नाही, छतावरून बेछुट गोळीबार

6

कानपुर, ३ जुलै २०२० : कानपूरमध्ये रात्री उशिरा कुख्यात बदमाशांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर झालेल्या जोरदार गोळीबारात सीओसह आठ पोलिस ठार झाले. याची पुष्टी एडीजी जय नारायण सिंह यांनी दिली आहे.

या गोळीबारात ब-याच पोलिस शिपायांना अत्यंत गंभीर अवस्थेत दवाखान्यामध्ये दाखल केले गेले आहे. पोलिस अधिकारी आणि अनेक पोलिस ठाण्यांचे फोर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही घटना कानपूरमधील चौबेपूर पोलिस स्टेशन परिसरातील बकरू गावची आहे. गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास बिठूर आणि चौबेपूर पोलिसांनी एकत्रितपणे रेकॉर्ड वरील कुख्यात आरोपी विकास दुबे याच्या बकरू गावातील घरावर छापा टाकला. बिठूर एसओ कौशललेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की विकास आणि त्याच्या ८-१० साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. घराच्या आत आणि छतावरून गोळ्या झाडण्यात आल्या.

घटनास्थळी उपस्थित एसओ बिथूरचा सहकारी (कॉन्स्टेबल) विकास बघेल रडत म्हणाला की पोलिसांची जीप गावात पोहोचताच सर्व पोलिस कारमधून उतरले, शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या ५० जणांनी दोन मजली घराच्या छतावरून हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने पोलिसही सावरू शकले नाहीत.

पहिली गोळी ही शिवराजपूरचे एसओ महेश यादव यांना लागली . त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि ते रक्ताने माखलेल्या आवस्थेतच जमिनीवर पडले . त्यानंतर गोळ्या आणि बॉम्बचा जणू वर्षावच झाला.

चौबीपूर पोलिस स्टेशनचे शिपाई मोहम्मद अजमल, जो घटनास्थळी धडक पथकाबरोबर गेला होता, त्यांने सांगितले की टीम घटनास्थळी पोहोचताच गोळीबार सुरू झाला. पोलिसांना सुरक्षित जागा शोधून कृती करण्यास संधीही मिळाली नाही.
गोळीबारात सीओ बिल्हौर देवेंद्र मिश्रा आणि एसओ शिवराजपूर महेश यादव हे जागीच ठार झाले.

त्याच्यासह सुमारे आठ पोलिसही शहीद झाले आहेत. तर एसओ बिथूर या इन्स्पेक्टरसह अनेक पोलिसांनाही गोळ्या लागल्या आहेत. ज्यांना गंभीर अवस्थेत रीजेंसी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हा हल्ला ज्या पद्धतीने करण्यात आला त्यावरून पोलिसांच्या या छापा टाकणा-या धडक पथकाची दखल गुन्हेगारांना मिळाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी तयारी करून पोलिसांवर हल्ला केला.

पोलिसांनी सांगितले की, विकास दुबे हा एक कुख्यात गुन्हेगार आहे, ज्याच्यावर २००३ मध्ये तत्कालीन कामगार कंत्राटी मंडळाचे राज्यमंत्री असलेले भाजपा नेते संतोष शुक्ला यांच्या हत्येचा आरोप केला होता. नंतर त्याला या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले. याशिवाय विकासवर राज्यभरात दोन डझनहून अधिक गंभीर प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

या घटनेत शहिद झालेले आधिकारी व कर्मचारी पुढील प्रमाणे, शहीद पोलिस जिल्हा अधिकारी बिल्हौर , देवेंद्र मिश्रा , स्टेशन प्रभारी शिवराजपूर महेशचंद्र यादव,चौकी प्रभारी मंधाना ,अनूप कुमार सिंह, सब इन्स्पेक्टर नेबू लाल , शिपाई सुलतान सिंह शिपाई राहुल, शिपाई बबलू, शिपाई जितेंद्र

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील या घटनेत बळी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांबद्दल शोक व संवेदना व्यक्त केल्या आहेत. सीएम योगी यांनी घटनेचा अहवाल बोलावून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डीजीपी एच सी अवस्थी यांना दिले आहेत. सीएम योगी यांनीही या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा