वाघोली, दि. १४ ऑगस्ट २०२०: स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोठेही सुरक्षितेच्या नियमाचा भंग होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी. सत्कार समारंभ खाऊ वाटप आशा कार्यक्रमाऐवजी रक्तदान शिबिर वृक्षरोपण यासारख्या सामाजिक उपक्रमांवर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भर द्या असे, आवाहन “शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके” यांनी केले आहे.
जिल्ह्यास वाघोली परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम घेताना सुरक्षितेच्या नियम कटाक्षाने पाळावे लागणार आहेत, त्यानुसार नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार नाही. याची काळजी घेण्याबाबत ज्ञानेश्वर कटके यांनी सूचना केल्या आहेत शासकीय कार्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम करताना कमीत कमी लोकांनी एकत्र यावे शाळा बंद असल्या कारणाने असे कार्यक्रम शाळांमध्ये घेण्याचा आग्रह नको तसेच विद्यार्थ्यांना शाळेत बोलऊ नये. शिवसैनिकांनी कार्यक्रम घेताना सामाजिक उपक्रमांवर भर द्या सॅनिटायझर वापरणे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे, तसेच ज्या ठिकाणी गरज असेल तेथे पोलिस यंत्रणेची मदत घ्यावी अशा सूचना ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहेत.
वाघोली परिसरातील गणेश मंडळांनी या वर्षी गणेश उत्सव साधेपणाने करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे ज्ञानेश्वर कटके यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येणे हे मोठे संकटाला आमंत्रण ठरू शकते गेली. पाच महिने वाघोलीकर यांनी अतिशय जबाबदारीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे.
त्याबद्दल, समस्त वाघोलीकर यांचे जाहीर आभार मानतो या गणेशोत्सवाच्या कालावधीत ही आपण सर्वजण गर्दी टाळून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी बोलताना ज्ञानेश्वर खटके यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे