कार्टोसॅट ३ ठेवणार सीमेवर लक्ष

नवी दिल्ली: चंद्रयान २ नंतर इस्रोने त्यांच्या उपग्रहांच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. स्वदेशी उपग्रहांना सोबत देशाबाहेरील उपग्रहांचा ही यामध्ये समावेश असणार आहे. इसरो केवळ देशातीलच उपग्रह नव्हे तर देशाबाहेरील उपग्रहांचे ही प्रक्षेपण करत आहे. ज्या माध्यमातून इसरो मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहे.
कार्टोसॅट ३ स्वदेशी उपग्रहा सोबतच इस्रो अमेरिकेतील १३ न्यानो सॅटॅलाइट सुद्धा प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह भारत सोमवारी दिनांक २५ नोव्हेंबरला सन सिंक्रोनस कक्षेत प्रस्थापित करणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ही माहिती काल दिली. इस्रोच्या पीएसएलव्ही एक्स एल या प्रक्षेपका द्वारे या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून येत्या २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनीटांनी करण्यात येणार आहे.
कार्टोसॅट ३ हा तिसऱ्या पिढीतील वेगवान व प्रगत उपग्रह आहे. अंतराळात ५०९ किलोमीटर दूर आणि ९७.५ यांच्यावर कललेल्या स्थितीत स्थापन करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा