संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा, परवागनी नाकारल्यानंतरही घेतली सभा

पुणे, ५ सप्टेंबर २०२३ : परवानगी नाकारली असताना देखील सभा आयोजित केल्याप्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लाॅन्स येथे संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. भिडे वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.

याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. मात्र परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा