ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील खटल्यात आज पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२३ : भारतीय कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात आज दिल्लीतील राऊस एवन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे. वास्तविक, २८ जुलै रोजी झालेल्या मागील सुनावणीत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर न्यायालयात चर्चा झाली होती. दरम्यान, ब्रिजभूषण यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बरीच पाने आहेत, त्यामुळे ती वाचण्यासाठी आणखी वेळ लागेल.

१५ जून रोजी दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यावर आता कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याचवेळी, मागील सुनावणीवेळी ब्रिजभूषण न्यायालयात उपस्थित नव्हते, त्यावर त्यांच्या वकिलाने ते काही कामानिमित्त बाहेर गेल्याचे न्यायालयाला सांगितले. अशा स्थितीत त्यांनी हजेरीतून सूट मिळावी यासाठी अर्ज केला आहे. यावेळी न्यायालयात कागदपत्रांच्या तपासणीबाबतही महत्त्वपूर्ण युक्तिवाद करण्यात आला.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ६ महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ए, ३५४डी अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा