भोकरदन येथे ६८ मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

भोकरदन, जालना २५ फेब्रुवारी २०२४ : सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदनमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात ६८ आंदोलकांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगेसोयरे कायदा अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष बनकर यांना देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलनात काही गडबड होऊ नये म्हणून अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे, सपोनि बालाजी वैद्य यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या आंदोलनानंतर पोलिसांच्या वतीने जवळपास ६८ जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा