पुरंदर २९ जानेवारी २०२१ : पुरंदर तालुक्यातील ९३ पैकी ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार होत्या. पिंगैरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने व १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यामुळे ५५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारीला पारपडल्या. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याने मोठी उत्सुक्ता वाढली होती. आज शुक्रवार दि.२९ रोजी सासवडच्या आचार्य आत्रे सांस्कृतिक भवनात आरक्षण सोडत झाली. पुर्वी झालेल्या नागरीकांचा मागास प्रवर्ग व स्त्री, अनुसुचीत जमाती व स्त्री ही आरक्षणे तशीच ठेवण्यात आली. तर सर्वसाधारण व स्त्री ही आरक्षणे नव्याने काढण्यात आली. सर्वसाधारणसाठी २९, सर्वसाधारण स्री ३०, नागरिकांचा मागास प्रवर्ग १२, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री १३, अनुसुचीत जाती ३, अनुसुचीत जाती स्त्री ३, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री २ अशी आरक्षणे झाल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी जाहीर केले.
पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण पुढील प्रमाणे. सर्वसाधारण तोंडल, कोडीत (खुर्द), लपतळवाडी, पिसे, नाझरे सुपे, हरगुडे, राजेवाडी, आंबोडी, रिसे, पुर-पोखर, नायगाव, साकुर्डे, केतकावळे/ कुंभोशी, जवळार्जुन, माहूर, धालेवाडी, सोनोरी, कोळविहिरे, खळद, दिवे, पिंपरी, बोऱ्हाळवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, नवलेवाडी, भिवरी, बोपगाव, पांडेश्वर, पिंपरे (खुर्द) सर्वसाधारण स्री धनकवडी, दवणेवाडी, नावळी, सोमर्डी, थापेवाडी – वारवडी, टेकवडी, खानवडी, पिसुर्डी, पोंढे, मावडी क.प, मांढर, वाघापूर, जेऊर, हिवरे, गुऱ्होळी, पारगाव, परिंचे, पिंपळे, सिंगापूर, गुळूंचे, एखतपूर- मुंजवडी, राजूरी, माळशिरस, वीर, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, पांगारे, कुंभारवळण, आस्करवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग नीरा – शिवतक्रार, सटलवाडी, पानवडी, पिंगोरी, पिसर्वे, मावडी सुपे, झेंडेवाडी, तक्रारवाडी, वाळूंज, हरणी, काळदरी, चांबळी. नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री बहिरवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, दौंडज, आंबळे, नाझरेक.प, मांडकी, निळूंज, कर्नलवाडी, खेंगरेवाडी – शिंदेवाडी, आडाचीवाडी,कोडीत (बुद्रूक), सुपे (खुर्द).
अनुसुचीत जाती बेलसर, वाल्हे, गराडे.
अनुसुचीत जाती स्त्री भिवडी, राख, शिवरी, .
अनुसूचित जमाती देवडी. अनुसूचित जमाती स्त्री चिव्हेवाडी,
घेरापुरंदर – मिसाळवाडी.
अशी जातनिहाय सरपंच आरक्षणे जाहीर झाली आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे