जम्मू, १३ सप्टेंबर २०२२ : जम्मू आणि काश्मीर पोलीस भरती घोटाळ्या प्रकरणात देशभरात ३३ ठिकाणी सी बी आय ची छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी जम्मू १३, श्रीनगर १, हरियाणा १३, गुजरात, युपी गाजियाबाद , बेंगलोरु आणि गांधीधाम मध्ये प्रत्येकी एका ठिकाणावरील छापेमारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भरती बोर्ड चे पूर्वअध्यक्ष खालिद जहांगीर आणि कंट्रोलर अशोक कुमार यांच्या ठिकाणावर ही छापीमारी सुरू आहे तसेच जम्मू कश्मीर पोलीस डीएसपी आणि सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात येत आहेत.
SI भरती घोटाळा हा तेव्हाच उघडकीस आला जेव्हा एड्युमॅक्स कोचिंग चे बहुतेक उमेदवार उपनिरीक्षक भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले जम्मू आणि कश्मीर उपनिरीक्षक भरतीची परीक्षा २७ मार्च २०२२ रोजी घेण्यात आली होती. यामध्ये ९७ हजार उमेदवारांनी परीक्षा फॉर्म भरला होता. त्यानंतर या भरती परीक्षेचा निकाल चार जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये १२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. पण परीक्षेत हेराफेरी च्या तक्रारीनंतर ही परीक्षा गेल्या महिन्यात रद्द करण्यात आली होती. ५ ऑगस्ट २०२२ रोजी जम्मू कश्मीर सब इन्स्पेक्टर भरती घोटाळ्यात ३० ठिकाणी छापे टाकले होते. जम्मूमधील २८ आणि श्रीनगर बंगलोर मध्ये प्रत्येक एका ठिकाणावर छापेमारी केली होती. तसेच CBI ने जम्मू कश्मीर उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणात ३३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे