नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२० : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करणार्या सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. एफआयआरमध्ये सुशांत सिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचेही नाव आहे. सीबीआयने आयपीसीच्या कलम ३०६, ३४१, २४२, ४२०, ४०६ आणि ५०६ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. सीबीआय एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांची नावे आहेत.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे, तिने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले. सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के के सिंग यांनी पटिया येथे रिया चक्रवर्ती यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. केके सिंह यांनी रियावर बरेच गंभीर आरोप केले. बिहार सरकारच्या सूचनेवरून केंद्र सरकारने सुशांत प्रकरणातील सीबीआय चौकशीला बुधवारी मान्यता दिली. सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदविला असून या प्रकरणाचा तपास वेगात सुरू केला आहे.
सीबीआयने बिहार पोलिसांकडेही संपर्क साधला आहे. सीबीआय सर्व बाबींची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या वडिलांनी पटण्यात रिया चक्रवर्ती यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्यापासून हे प्रकरण रियाभोवती फिरत आहे.
रिया चक्रवर्ती यांच्याविरूद्ध त्यांच्याकडे ठाम पुरावे असल्याचा दावा बिहार पोलिस करीत आहेत. या प्रकरणात, रियाच्या अडचणी सतत वाढत आहेत. यापूर्वी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. ईडीने रियाला शुक्रवारी हजर होण्यास सांगितले आहे. रियाला तिच्या प्रॉपर्टी आणि सुशांतबरोबरच्या व्यवहारांविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी