सीबीएससी बारावीचे निकाल जाहीर

25

नवी दिल्ली, दि. १३ जुलै २०२०: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाला मिळालेल्या माहितीनुसार, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसई १२ वीची परीक्षा पास झाले आहे. ज्यामध्ये दिल्ली झोनचा ९४ टक्के निकाल लागला. सीबीएसई बारावीची परीक्षा मुलींनी जिंकली आहे. यावेळी बारावीतील मुलींचा निकाल ९२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसई १२ वी मधील विद्यार्थ्यांची उत्तीर्णता टक्केवारी ५.३८ टक्के जास्त आहे. मागील वर्षी ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सीबीएसई १२ वीचा निकाल या वेबसाइटवर तपासता येईल

cbseresults.nic.in

cbse.nic.in

results.nic.in

मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी ट्विट करून निकालाची माहिती दिली होती. निकालाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की सीबीएसई बारावीचा निकाल CBSE Class XII Results cbseresults.nic.in वर तपासता येतो. ते म्हणाले की विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि चांगले शिक्षण हे त्यांचे प्राधान्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा