केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांसाठी आणि अनुभवांसाठी एक अभिनव व्यासपीठ दिले आहे. आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत पॉडकास्ट आणि सोशल मीडिया कंटेंटमध्ये थेट सहभागी होता येणार आहे, ज्यामुळे त्यांचे विचार थेट समाजापर्यंत पोहोचतील. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी ऑडिओ संवाद, छोटे व्हिडिओ आणि स्वतःचे अनुभव शेअर करू शकतील.
यामुळे शैक्षणिक सामग्री अधिक जीवंत आणि विद्यार्थी-केंद्रित बनणार आहे. सीबीएसईने शाळांना अशा विद्यार्थ्यांची शिफारस करण्यास सांगितले आहे जे स्पष्ट आणि आत्मविश्वासाने संवाद साधू शकतात. या संधीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या लेखी संमतीची आवश्यकता असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































