पुणे, २७ सप्टेंबर २०२२ : २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक पर्याटन दिनाच्या निमित्ताने काही विशेष टिप्स…
१. वर्षातून एकदा लांब ब्रेक घेऊन फिरायला जा.
२. परदेशी ट्रिप करुन तेथील सौंदर्यांचा आस्वाद घ्या.
३. पर्यटनामुळे रोजच्या आयुष्यातून ब्रेक मिळतो. त्यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने होते. मन शुद्ध होते.
४. महिन्यातून एकदा कुटूंबासोबत फॅमिली ट्रीप प्लॅन करा. जेणे करुन तुमच्या कामाच्या रगाड्याच्या ताण कमी होईल.
५. ज्या ठिकाणी जाणार असाल, त्याचा नकाशा जवळ बाळगा. तेथील आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती मिळवा. तेथील हॉटेल्स आणि गाईडचे कॉन्टॅक्ट नंबर जवळ ठेवा.
६. तुमचे नातेवाईक आणि महत्त्वाचे नंबर जवळ ठेवा.
७. हॉटेलच्या रुमची सेटल होण्याआधी तपासणी करा. पब्लिक वाय-फायचा वापर करताना सावधगिरी बाळगा.
८. पर्यटनाला निघताना टॉवेल्स आणि छोटी बॅग कायम जवळ बाळगा.
९. आयुष्यात एकदा तरी एकट्याने ट्रॅव्हल करण्याचा आनंद घ्या.
१०. कायम तिथल्या लोकल पर्यटनाला भेट द्या. तसेच कायम लोकल गाईड करावा. त्यांना जास्त माहिती असते.
११. प्रथमोपचाराचे साहित्य जवळ बाळगा.
१२. तिथल्या लोकल अन्नाचा स्वाद घ्या. ज्या ठिकाणी जाल तिथल्या लोकांमध्ये मिसळा. त्यांच्याशी सगळ्या जागांबद्दल माहिती करा.
अशा अनेक गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे पर्यटन उत्तम होईल आणि पर्यटन दिवसाचा आनंद तुम्ही लुटू शकाल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस