हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची १०७ वी जयंती साजरी

पुणे, दि.१ जुलै २०२० : हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे चौथे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १०७ व्या जयंती निमित्ताने म्हसोबा गेट, शेतकी महाविद्यालय शिवाजीनगर येथील स्व. वसंतराव नाईक यांचा प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप पूजन वंदन करण्यात आले.१ जुलै हा दिवस राष्ट्रीय कृषि दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्या वेळी माननीय उपमहापौर सरस्वती शेंडगे, महा प्रदेश अध्यक्ष मुर्ती जयराम राठोड, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांचा शुभहस्ते वंदन करण्यात आले.

वसंतराव नाईकांचा जीवनावर प्रास्ताविक श्री. मूर्तीभाऊ राठोड यांनी केले. त्यावेळी मा. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना श्री. मूर्तीभाऊ राठोड यांनी आपल्या समाजमध्ये कसा विकास करता येईल यादृष्टीने
निवेदन दिले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना भटक्या विमुक्त जाती जमातीतील शेतकरी वर्ग व गोर गरीब जनतेसाठी लढा दिला, परंतु आज या समाजातील मुलांना महानगरपालिकेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात अशी मागणी ह्या मध्ये केली आहे.

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डी. पी. कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जोशी समाजाचे श्री. दिलीप परदेशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गोर गरिबांचे कैवारी वसंतराव नाईकांसारखे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत मिळू शकणार नाहीत.

चंद्रकांत राठोड, चिमण राठोड, फकिरचंद जाधव, श्रीमंत जाधव, काशिनाथ राठोड, रामराव राठोड, राजेश पवार, सतीश चव्हाण, रामदास राठोड, रामराव राठोड, राजेश पवार, सतीश चव्हाण, दशरथ चव्हाण, महाराज राठोड, सचिन राठोड, मंगल पवार, मोतीबाई उडते, सिंधु शिंदे, ओबीसी चे नेते शरद पवार इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवटी नरसिंग चव्हाण यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा